
रविवारपासून श्रीलंकेत भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांमध्ये वनडे तिरंगी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघावर दणदणीत विजय मिळवला आहे.
आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ९ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना पावसामुळे प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला होता.