India probable playing XI for 2nd Test vs England 2025
भारतीय संघाला ( IND vs ENG ) इंग्लंड दौऱ्यावर पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने ५ विकेट्स राखून ३७१ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. त्याच्यावरील कामाचा ताण लक्षात घेता, या दौऱ्यावर तीन कसोटीतच त्याला खेळवण्यात येणार आहे. पण, काल सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएचेट यांनी जसप्रीत उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे विधान करून इंग्लंडला बुचकळ्यात टाकले.