

India vs England 4th T20I: भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे शुक्रवारी (३१ जानेवारी) खेळवण्यात येणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
सध्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी ही जमेची बाजू आहे, पण तरी इंग्लंडने तिसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, अशात भारतीय संघ त्यांना हलक्यात घेणार नाही.