India Playing XI for 1st T20I against New Zealand 2026
esakal
India Playing XI for 1st T20I against New Zealand 2026: वेस्ट इंडिज मालिकेपाठोपाठ वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) न्यूझीलंड दौऱ्यावरही बाकावर बसून रहावे लागणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी संजू सॅमसन व अभिषेक शर्मा, हीच ओपनिंग जोडी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल, हे स्पष्ट केले. त्यामुळे वैभवचे खेळणे अनिश्चित झाले आहेच, परंतु उर्वरित ९ खेळाडू कोण असतील याची उत्सुकता वाढली आहे. भुवनेश्वर कुमार चार वर्षानंतर भारतीय संघात परतणार आहे आणि जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व करेल. भारत-न्यूझीलंड पहिला ट्वेंटी-२० सामना गुरुवारी ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.