India Probable ODI Squad for Sri Lanka Series: मोहम्मद सिराज बाकावरच, जसप्रीत बुमराहला विश्रांती? श्रीलंकाविरुद्ध कशी असेल भारताची वन डे टीम? लवकरच घोषणा

India probable ODI squad for Sri Lanka series 2026: न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
India probable ODI squad for Sri Lanka series 2026

India probable ODI squad for Sri Lanka series 2026  Mohammed Siraj Set to Miss Out, Jasprit Bumrah Likely to Be Rested 

esakal

Updated on: 

India vs Sri Lanka ODI squad announcement latest news: न्यूझीलंड दौऱ्यावर ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ कसोटीत संघर्ष करताना दिसतोय. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघावर पराभवाचे सावट असताना आगामी मालिकेची चर्चा सुरू झाली आहे. भारताला पुढील मालिकेत घरच्या मैदानावर श्रीलंकेचा तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांत सामना करायचा आहे. या मालिकेसाठीच्या संघ निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून BCCI येत्या एक-दोन दिवसात घोषणा करण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...