Vaibhav Sooryavanshi
esakal
India probable playing XI for 5th T20I against West Indies: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-२० मालिका रंजक वळणावर आहे.. पाहुण्या वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आणि आता चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या पाचव्या सामन्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. इंग्लंड, आयर्लंडकडून ट्वेंटी-२० मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रेयस अय्यरचा संघ आता कुठे सावरला होता. पण, वेस्ट इंडिजच्या आक्रमक खेळीने त्यांना पुन्हा जागे केले आणि उणीवा समोर आणल्या. त्यामुळेच पाचव्या सामन्यात विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणारा भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.