India women qualify for ICC World Cup final 2025
esakal
India Women vs Australia Women Semi Final Marathi Cricket News : ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्यानंतर भारताला हलक्यात घेण्याची चूक केली. पण, मुंबईच्या खेळपट्टीवर क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने ( Jemimah Rodrigues stunning century) मॅच विनिंग शतक झळकावले. दोन्ही सलामीवर कमी धावसंख्येवर माघारी परतल्यानंतर जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरसह विक्रमी भागीदारी केली. या दोघींच्या खेळीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आणि जेमिमाने ऑस्ट्रेलियाचा निकाल लावला. भारताने रोमहर्षक विजयाची नोंद करताना महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ( India women qualify for ICC World Cup final 2025) आता त्यांना फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.