
India break Australia World Record in 1st T20I against England : भारतीय संघ कोलकाताचा सामना जिंकून सातव्या आसमानात आहे आणि त्यामागे कारणही तसेच आहे. टीम इंडियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून विश्वविक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-२० सामन्यात सर्वाधिक चेंडू राखून इंग्लंडवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. गोलंदाजांच्या अतुलनीय नियोजनाचा आणि फलंदाजांच्या स्फोटक खेळीने भारताने हा विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रमही मोडीत काढला आहे.