

ishan Kishan - Suryakumar Yadav | India vs New Zealand 5th T20I
Sakal
New Zealand need 272 runs against India in 5th T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिरुअनंतपूरम येथे शनिवारी (३१ जानेवारी) होत असलेला पाचवा टी२० इशान किशनने गाजवला आहे. इशान किशनने या सामन्यात शतक केले आहे. तसेच सूर्यकुमार यादवने अर्धशतक त्यामुळे भारताने (Team India) या सामन्यात न्यूझीलंडसमोर विक्रमी २७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात भारतीय संघाकडून एकूण २३ षटकार मारण्यात आले. त्यामुळे आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांच्या टी२०सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार (Most Sixes in the T20I innings) मारण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी झाली आहे. यापूर्वी भारतानेच २०२४ मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ षटकार मारले होते.