
इंग्लंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याचा चौथा दिवस केएल राहुल आणि रिषभ पंतने गाजवला आहे. दोघांनीही शानदार भागीदारी करत इंग्लंडला सातवलं असून भारताचे वर्चस्व निर्माण केले आहे.
या सामन्यात भारताला पहिल्या डावात केवळ ६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसरा डाव महत्त्वाचा होता. पण भारतासाठी केएल राहुलने शानदार शतक आणि रिषभ पंतने अर्धशतक करत भारताला मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचून दिला आहे.