India vs West Indies Tests: Rishabh Pant Out, Devdutt Padikkal Likely to Get Call-Up
esakal
इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून रिषभ पंत पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे.
करून नायरला दुसरी संधी मिळूनही तो प्रभाव दाखवू शकला नाही आणि त्यामुळे त्याला संघाबाहेर जावे लागणार आहे.
देवदत्त पडिक्कलने भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्यात १५० धावांची खेळी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.
Why Rishabh Pant is out of India vs West Indies Test squad: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आशिया चषक स्पर्धेत खेळतोय आणि ही स्पर्धा २८ स्पटेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेच चार दिवसांनी IND vs WI कसोटी मालिका सुरू होतेय, त्यामुळे गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यात रिषभ पंत इंग्लंडमध्ये झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या खेळण्यावरही संभ्रम आहेच. सात वर्षांनी भारताच्या कसोटी संघात स्थान मिळूनही फार कमाल दाखवू न शकलेला करूण नायर मात्र संघाबाहेर जातोय, हे निश्चित झालंय.