INDIA SQUAD VS AFGHANISTAN: भारताच्या संघात गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन... वन डेत ४, तर कसोटीत ७ खेळाडू

Gujarat Titans players in India squad vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी जाहीर झालेल्या टीम इंडियाच्या संघात गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. वनडे संघात तब्बल चार, तर कसोटी संघात सात खेळाडूंना संधी मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये ‘टीम इंडिया की गुजरात टायटन्स?’ अशी चर्चा रंगली आहे
Gujarat Titans players in India squad vs Afghanistan

Gujarat Titans players in India squad vs Afghanistan

esakal

Updated on

Team India dominated by Gujarat Titans stars: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरणार आहे. या संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले असल्याने जलदगती गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. वन डे संघात ही भूमिका प्रसिद्ध कृष्णा पार पाडेल. पण, या संघ निवडीवरून वेगळाच वाद सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com