T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

India vs England T20 World Cup 2026 Semi Final Marathi News : वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या धावांच्या लढतीत भारताने इंग्लंडवर मात करत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताने प्रथम फलंदाजी करत २५३ धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसनच्या वादळी खेळीने भारतीय डावाला वेग दिला, तर इतर फलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली.
India defeated England in a high-scoring T20 World Cup semi-final( Photo Credit : Vijay Bate)

India defeated England in a high-scoring T20 World Cup semi-final( Photo Credit : Vijay Bate)

esakal

Updated on

India vs New Zealand T20 World Cup Final March 8 Ahmedabad: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला... भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले... संजू सॅमसनने ( Sanju Samson) च्या वादळी खेळीला इंग्लंडच्या जेकब बेथल ( Jacob Bethell) अविश्वसनीय खेळीसह प्रत्युतर दिले. पण, जसप्रीत बुमराहची दोन षटकं राखून ठेवण्याचा डाव यशस्वी झाला आणि भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने शवेटच्या पाच षटकांत पुनरागमन केले आणि आता ८ मार्च रोजी जेतेपद कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com