

Team India
Sakal
India T20 World Cup Practice ahead of Zimbabwe Match: यशापेक्षा अपयश जास्त काही शिकवून जाते. एका सामन्यातील अपयशानंतर भारतीय संघ ताळ्यावर आलेला आढळला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सरावाला आलेल्या भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात दडपणाबरोबरीने ठाम निश्चय दिसू लागला. भारतीय क्रिकेट संघाची एका पराभवानंतर देहबोली बदललेली दिसली.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळी स्पर्धेच्या चारही सामन्यांत विजय मिळवूनही भारतीय संघाच्या मोहिमेत अपेक्षित हुरूप आला नव्हता. कारण त्यात नेहमीचा रुबाब नव्हता आणि सर्वोत्तम खेळ करत असल्याची ग्वाही नव्हती. वरून भारतीय संघ व्यवस्थापन कितीही ऑल इज वेल सांगत होते तरी फलंदाजीतला अडखळता प्रवास कधी थांबणार, अशी चिंता डोकावत होती.