T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

India Squad for T20 WC: आगामी टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाकोणाला संधी देण्यात आली आहे, जाणून घ्या.
Team India
Team IndiaSakal

India Squad for T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. 1 जून ते 29 जूनदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. आता केवळ एक महिना राहिला असताना या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीची आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांची मंगळवारी अहमदाबाला बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

दरम्यान, भारताच्या संघात कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे, तसेच उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिकने गेल्या वर्षी रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

पण रोहितचे टी20 मध्ये या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याच्याकडे त्याने पुन्हा भारतीय टी20 संघाच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली. त्यामुळे आता रोहित टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्वपद, तर हार्दिक उपकर्णधारपद सांभाळताना दिसेल.

Team India
Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

याबरोबर 2023 वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिकला भारतीय संघात गेल्या अनेक महिन्यात खेळता आले नाही. त्यामुळे आता त्याचे भारतीय संघातील पुनरागमनही टी20 वर्ल्ड कपमधूनच होईल.

केएल राहुलला डच्चू

टी20 वर्ल्ड कपसाठी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला पसंती देण्यात आली आहे. मात्र, यामुळे केएल राहुलला मात्र संघात स्थान मिळालेलं नाही. या संघात स्थान मिळवण्यासाठी तो देखील शर्यतीत होता. त्याने आयपीएल 2024 मध्येही चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्याच्याआधी पंत आणि सॅमसनला पसंती दिली आहे.

चार अष्टपैलू संघात

टी20 वर्ल्ड कपसाठी निवड समितीने भारतीय संघात हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या चार अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळाली आहे. जडेजा आणि अक्षर हे फलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाजीतही मोलाचा वाटा उचलू शकतात.

दरम्यान, दुबे आणि हार्दिकच्या गोलंदाजीवर मात्र प्रश्नचिन्ह आहे. दुबेने अद्याप आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजी केलेली नाही, मात्र त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. तसेच हार्दिकनेही आयपीएल 2024 मध्ये 4 विकेट्स घेतल्या असल्या, तरी तो फार गोलंदाजी करताना दिसलेला नाही.

Team India
India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

फलंदाज अन् गोलंदाज

दरम्यान, रोहितसह सलामीला फलंदाजीसाठी यशस्वी जैस्वालला भारतीय संघात संधी दिली आहे. याशिवाय विराट कोहलीही वरच्या फळीत फलंदाजीसाठी पर्याय आहे, तर सूर्यकुमार यादवही संघात आहे.

गोलंदाजी फळीमध्ये फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे, तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहसह आर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे पर्याय आहेत.

राखीव खेळाडू

राखीव खेळाडूंमध्ये सलामीवीर शुभमन गिल, रिंकू सिंग, वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ  : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com