BCCI announces Indian squad for home Tests 2025 : भारतीय संघ घरच्या मैदानावर आणखी एक कसोटी मालिका जिंकण्याच्या तयारीला लागली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका सहज जिंकल्यानंतर आता भारतासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI बुधवारी भारतीय संघ जाहीर केला. इंग्लंड दौऱ्यावर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला रिषभ पंत ( Rishabh Pant) याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.