India to Face South Africa in Sole Warm-Up Match
India warm-up match before T20 World Cup defence: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी सूर्यकुमार यादवचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. पाच सामन्यांची ही मालिका ३१ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथील पाचव्या सामन्यानंतर संपेल. त्यानंतर मुंबईत त्यांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या किताबाच्या बचावासाठी संघ पुन्हा एकत्र येईल. यजमान संघ ७ फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पण, त्यापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळतील.