

INDIA 600TH TEST MATCH
esakal
INDIA 600TH TEST MATCH: भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यात आजपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये भारत आज आपला ६०० वा कसोटी सामना खेळणार आहे. हा ऐतिहासिक टप्पा गाठणारा भारत केवळ तिसरा देश ठरणार आहे. या यादीत याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे.