
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील हेडिंग्लेला झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाकडून ५ शतके झाली होती, तरी भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला.
भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडला रोखण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. यादरम्यान केवळ जसप्रीत बुमराह किफायतशीर गोलंदाजी करू शकला. त्यानेच पहिल्या डावात ५ विकेट्सही घेतल्या. पण बुमराह सर्व सामन्यात खेळणार नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याव्यतिरिक्तही इतक गोलंदाजांनी आता जबाबदारी घेणे महत्त्वाचे राहणार आहे.