Hardik Pandya ruled out of England ODI series
esakal
India ODI squad update for England tour: इंग्लंड दौऱ्यासाठी आज किंवा उद्या भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांच्यासह सीनियर खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार आहे. पण, त्यांच्या फिटनेसचा विषय आहेच.. अशात हाती आलेल्या वृ्त्तानुसार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) या मालिकेतून माघार घेतली आहे. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्याने त्याला या मालिकेत खेळता येणार नाही.