

India U 19 vs Pakistan U 19 : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया चषक १९ वर्षांखालील स्पर्धेत आज दोन्ही संघ समोरासमोर आले आहेत आणि पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. उस्मान खान व शाहजैब खान यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची सलामी देताना सामन्यावर पकड घेतली होती. ७ गोलंदाज वापरून यश मिळत नसताना कर्णधार सी आंद्रे सिद्धार्थने चेंडू मुंबईचा फलंदाज आयुष म्हात्रेकडे दिला अन् त्याने १० धावांच्या फरकाने पाकिस्तानला दोन धक्के दिले.