India U19 vs Australia U19 2-0 series win
esakal
India U19 beat Australia by 7 wickets in 2nd Test: भारताच्या १९ वर्षांखालील मुलांनी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवताना वन डे पाठोपाठ कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धची दुसरी कसोटी लढत भारताने ७ विकेट्स राखून जिंकली. भारताने वन डे मालिका ३-० अशी खिशात घातली होती आणि आता कसोटीतही २-० असा विजय मिळवला. भारताच्या सिनियर्सनाही असे यश कदाचीत मिळवता आले नसावे, जे ज्युनियर्सनी मिळवून दाखवले.