IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

India U19 To 3-0 Series Whitewash Over Australia: भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाविरुद्ध तिसऱ्या १९ वर्षांखालील वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे.
India U19 To 3-0 Series Whitewash Over Australia

India U19 To 3-0 Series Whitewash Over Australia

Sakal

Updated on

U19 India vs U19 Australia ODI Marathi News: भारताच्या युवा क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाला बुधवारी (२३ सप्टेंबर) राजकोटला झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केलं आहे.

त्यामुळे भारतीय युवा संघाने तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने सहज जिंकली. तिसऱ्या सामन्यातील विजयात भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी याने शतक करत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात युवा ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २५५ धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने ४१.२ षटकातच ४ विकेट्स गमावत पूर्ण केले.

India U19 To 3-0 Series Whitewash Over Australia
U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com