
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आयसीसी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुलींच्या संघाला ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. मलेशिया येथे झालेल्या ICC U19 women's T20I World Cup 2025 मध्ये भारतीय संघाने जेतेपद कायम राखले. २०२३ मध्ये भारताने जेतेपद पटकावले होते आणि आज निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपद राखण्यात यश मिळवले. BCCI ने भारतीय महिला संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.