IND U19 vs BAN U19 : वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडणार; भारताचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना केव्हा, कुठे होणार? जाणून घ्या डिटेल्स

India U19 vs Bangladesh U19 U19 World Cup 2026: भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला. पण, या सामन्यात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) अपयश आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, आज १४ वर्षीय फलंदाजाची बॅट तळपणार आहे आणि भारतासमोर शेजारी बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
India Under 19 vs Bangladesh Under 19 in ICC Men’s U19 World Cup 2026

India Under 19 vs Bangladesh Under 19 in ICC Men’s U19 World Cup 2026

esakal

Updated on

India Under 19 vs Bangladesh Under 19 World Cup 2026 match details : भारताचा १९ वर्षांखालील संघ शनिवारी आयसीसी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सातव्या सामन्यात बांगलादेश क्रिकेट संघाशी सामना करेल. या सामन्यात सर्वांचे लक्ष युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) याच्यावर असणार आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या वैभवकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथे खेळला जाईल. भारताने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेवर विजय मिळवला, तर बांगलादेश आज त्यांचा पहिलाच सामना खेळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com