

IND U-19 vs SL U-19
esakal
India U-19 Clinch Youth Test Series: भारताच्या १९ वर्षांखालील संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या युवा कसोटी सामन्यात २११ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका १-० अशी आपल्या नावावर केली. कोलंबोच्या आर.
प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत धडाकेबाज कामगिरी केली. विशेष म्हणजे, युवा वनडे मालिकेत १-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर भारताने कसोटी मालिकेत जोरदार पुनरागमन केलं.