IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला

IND vs AFG 1st ODI Target Update: भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजने विक्रमी शतक झळकावलं. मात्र भारताच्या पदार्पणवीर हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनीही आपली प्रतिभा दाखवत अफगाणिस्तानला २०० धावांच्या आत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
Rahmanullah Gurbaz  | Harsh Dubey | India vs Afghanistan

Rahmanullah Gurbaz | Harsh Dubey | India vs Afghanistan

Sakal

Updated on

India vs Afghanistan 1st ODI: शनिवारी धरमशाला येथे भारत आणि अफगाणिस्तान संघात वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना २५-२५ षटकांचा करण्यात आला आहे.

पावसानंतर ४ तासांच्या प्रतिक्षेनंतर सुरू झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून रहमनुल्ला गुरबाजने (Rahmanullah Gurbaz) शानदार शतक केले. पण असे असतानाच त्याच्या शतकानंतर विदर्भाच्या हर्ष दुबेने (Harsh Dubey) भारतीय संघाला चांगले पुनरागमन करून दिले. तसेच गुरनूर ब्रारनेही (Gurnoor Brar) अफलातून गोलंदाजी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला भारताविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य आहे.

Rahmanullah Gurbaz  | Harsh Dubey | India vs Afghanistan
IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com