IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

India Seal 3-0 Series against Afghanistan: भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या वनडेत दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शतक केले.
Rohit Sharma  - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI

Rohit Sharma - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI

Sakal

Updated on

India vs Afghanistan 3rd ODI: भारतीय संघाने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. शनिवारी (२० जून) चेन्नईत झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ९ विकेट्सने पराभूत केले आहे.

भारताच्या विजयात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मासह प्रसिद्ध कृष्णा यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे भारताने या मालिकेत निर्विवाद वर्चस्व ठेवत ३-० ने विजय मिळवला.

या सामन्यात अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने केलेल्या शतकामुळे भारतासमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने २८.४ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केला. जैस्वालने खणखणीत शतक ठोकले.

Rohit Sharma  - Yashasvi Jaiswal | IND vs AFG ODI
IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com