

Hashmatullah Shahidi Century | IND vs AFG ODI
Sakal
India vs Afghanistan 3rd ODI: भारत आणि अफगाणिस्तान संघात वनडे मालिकेतील अखेरचा आण तिसरा वनडे सामना चेन्नईला खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानला भारताच्या वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) मोठे धक्के दिले होते, पण नंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने (Hashmatullah Shahidi) तारले. त्याने शतक केल्याने भारतासमोर २१९ धावांचे समाधानकारक लक्ष्य अफगाणिस्तानला उभं करता आले आहे.
या मालिकेत भारताने यापूर्वीच दोन्ही सामने जिंकून मालिका विजय निश्चित केला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न भारताचा आहे, तर अफगाणिस्तान प्रतिष्ठा राखण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.