

Manav Suthar Shines | India vs Afghanistan
Sakal
India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान संघात शनिवारपासून (६ जून) कसोटी सामना मुल्लनपूरला खेळला जात आहे. पहिल्या दोन दिवसांनंतर या सामन्यात भारताचे वर्चस्व दिसून येत आहे. दुसरा दिवस (रविवार, ७ जून) संपला, तेव्हा भारतीय संघ ४५१ धावांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवशी भारताकडून पदार्पण केलेला युवा फिरकीपटू मानव सुतारची चमकदार कामगिरी झाली.
या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी ३ बाद ३६८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी कर्णधार शुभमन गिल शतक करून, तर रिषभ पंत अर्धशतक करून नाबाद होते. या दोघांनी सुरुवात चांगली केली. पण गिलला सलीम साफीने १२६ धावांवर बाद केले. त्यानंतर ध्रुव जुरेललाही १९ धावांवर त्रिफळाचीत केले.