IND vs AUS 2nd Test: 'Head' मास्टर! भारतीय संघ संकटात; निम्मा संघ पाठवला माघारी, ऑस्ट्रेलियाची दादागिरी

Border Gavaskar Trophy 2024: जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वन डे वर्ल्ड कप फायनमध्ये टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या डावखुऱ्या ट्रॅव्हिस हेडने Pink Ball Test मध्येही शड्डू ठोकला...
Travis Head IND vs AUS 2nd Test
Travis Head IND vs AUS 2nd Testesakal
Updated on

IND vs AUS 2nd Test Day 2 stump Marathi Update:

मिचेल स्टार्कच्या ६ विकेट्सनंतर ट्रॅव्हिड हेडने पुन्हा एकदा टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. Pink Ball Test चा दुसरा दिवस वादग्रस्त राहिला. मिचेल मार्शला नाबाद देण्यावरून वाद सुरू झाला ते हेड व मोहम्मद सिराज यांच्या शाब्दिक बाचाबाचीने संपला. पण, एडिलेडवर यजमान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. भारताच्या १८० धावांच्या प्रत्यु्त्तरात त्यांनी ३३७ धावा करताना १५७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताचे ५ फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com