

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाची वाईट अवस्था केली आहे. लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारताला किमान दोनशेपार पोहोचता आले. आघाडीच्या फळीने पुन्हा एकदा माती खाल्लेली दिसली आणि त्यामुळे ४४५ धावांचा पाठलाग करताना निम्मा संघ ७४ धावांवर तंबूत परतला होता. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) संतापलेला दिसला आणि जणू आपणच आता फलंदाजीला जायला हवं, अशी त्याची देहबोली होती.