
ICC Test Championship 2023-25: कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कोण खेळणार, यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यासह दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आजपासूनच (२६ डिसेंबर) सुरू होणारा कसोटी सामनाही तेवढाच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर भारतीयांचेही लक्ष असणार आहे.
आफ्रिकेच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे. आफ्रिकेने यासाठी कंबर कसली असून, वेगवान खेळपट्टी तयार केली आहे. यातच पाकिस्तानचे प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदीने आपला विचार करू नये, असे पाक मंडळाला कळवले आहे.