
India vs Australia Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला गुरुवारपासून (२६ डिसेंबर) सुरूवात झाली आहे. हा सामना कसोटी मालिकेतील चौथा सामना आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला प्लेइंग इलेव्हनमधील बदलाबद्दल विचारले. रोहितने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच बोलताना बदलाचे संकेत दिले होते. त्यानुसार त्याने नाणेफेकीनंतर सांगितले की प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे.