Champions Trophy 2025 semi-final qualification scenario : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील तीन स्पर्धक निश्चित झाले आहेत. अ गटातून भारत व न्यूझीलंड यांनी अंतिम चारमध्ये आपले स्थान सहज निश्चित केले. ब गटात ऑस्ट्रेलियाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आणि त्यामुळे त्यांना सहज पोहोचता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्धचा काल झालेला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४ गुणांसह ब गटातून उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला. आज इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला ब गटातील शेवटचा साखळी सामना होणार आहे आणि त्यानंतर चौथा स्पर्धक निश्चित होईल. नेट रन रेट पाहता आफ्रिकेचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के आहे, फक्त ब गटातून ते कोणत्या क्रमांकावरून अंतिम चारमध्ये जातील हे निश्चित होईल.