
Gautam Gambhir wanted Cheteshwar Pujara in India squad: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका खेळत आहे. मात्र भारताची यंदा ऑस्ट्रेलियात सलग तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी हुकली आहे. चार सामन्यांनंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पिछाडीवर आहे.
आता या मालिकेतील अखेरचा सामना सिडनीमध्ये ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पर्थला झालेल्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावाचा अपवाद वगळला, तर भारतीय फलंदाजांची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.