

Asia Cup Semi-Final, India Women vs Bangladesh Women Semifinal
Sakal
Asia Cup Semi-Final, India Women vs Bangladesh Women Semifinal: महिलांच्या आशिया करंडक स्पर्धेत सहा वर्षांपूर्वी अंतिम सामन्यात बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला असला, तरी यंदाच्या स्पर्धेत आज (१० सप्टेंबर) होत असलेल्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचे पारडे जड आहे.
बांगलादेशमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भारत आणि बांगलादेशचे राजनैतिक संबंध ताणलेले आहेत. त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. त्यामुळे आजचा सामना त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे.