
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये सुरू झाला. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात इंग्ंलड संघाकडून सुरुवात चांगली झाली आहे. मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणासाठी मात्र पदार्पणाची सुरुवात नाट्यमय राहिली.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की त्याला प्रथम गोलंदाजीच करायची होती. त्यामुळे नाणेफेक हरल्यानंतरही गोलंदाजीच करायला मिळणार आहे.