

India vs England T20I
Sakal
England vs India, 1st T20I: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला बुधवारपासून (१ जुलै) सुरुवात होत आहे. या दौऱ्यात आधी टी२० मालिका खेळली जाईल. पहिला टी२० सामना चेस्टर-ल-स्ट्रीट येथील रिव्हरसाईड ग्राऊंड येथे खेळवला जाणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वात खेळणाऱ्या भारतीय संघासमोर आता चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असेल, कारण या मालिकेपूर्वी आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाला दोन सामन्यांच्या टी२० मालिकेत ०-२ असा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता भारताच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे.
भारतासमोर हे अपयश मागे टाकून पुढे जाण्याचे आव्हान आहे. पण असे असतानाच या सामन्यात पावसाचीही शक्यता आहे.