IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

ICC Men's T20I batting rankings latest update: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या पुरुषांच्या ट्वेंटी-२० फलंदाजी क्रमवारीत त्याची अव्वल क्रमांकावरील जागा आता इशान किशनने पटकावली आहे.
Ishan Kishan has replaced Abhishek Sharma as the world's No.1 batter in the latest ICC Men's T20I Rankings

Ishan Kishan has replaced Abhishek Sharma as the world's No.1 batter in the latest ICC Men's T20I Rankings

Updated on

Abhishek Sharma loses top spot in ICC T20I rankings: भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होतेय. चेस्टर ली स्ट्रीटवर भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता पहिल्या ट्वेंटी-२० सामन्याला सुरूवात होणार आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवातून बाहेर पडण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध मैदान गाजवावे लागणार आहे. अशात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला मोठा धक्का बसला आहे. अभिषेकने ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतील नंबर वन स्थान गमावले आहे आणि भारतातच इशान किशन ( Ishan Kishan No. 1) अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com