IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

India vs England 1st T20I live streaming details: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत असून, पहिला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना नेमका Sony Sports Network वर पाहायचा की Star Sports वर? याबाबत अनेक चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
India vs England 1st T20I live streaming details

India vs England 1st T20I live streaming details

esakal

Updated on

Where to watch India vs England 1st T20I live: आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत ०-२ अशा पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी टीम इंडिया तयार झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेल आजपासून सुरूवात होत आहे आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची पुन्हा कसोटी लागणार आहे. आयर्लंडविरुद्ध खराब कामगिरीमुळे भारतीय संघावर टीका होत आहे आणि त्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी न दिल्याने, आधीच रोषाचा सामना करावा लागत आहे. अशात IND vs ENG मालिका नेमकी कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळेल, हा पेच चाहत्यांसमोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com