

India vs England 4th T20I
Sakal
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय टी२० संघाला अद्यापही विजयाची प्रतिक्षा आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० मालिकेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण त्यानंतर झालेल्या दोन्ही टी२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
विशेष म्हणजे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ १२५ धावांनी पराभूत झाला. त्यामुळे सध्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.