IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

India's biggest defeat by runs in T20I: इंग्लंडकडून १२५ धावांनी झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला.
Shreyas Iyer reaction after India defeat

Shreyas Iyer reaction after India defeat

esakal

Updated on: 

Shreyas Iyer reaction after India defeat vs ENG 3rd T20I: भारतीय संघाला ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवताना भारताचा संपूर्ण संघ ७६ धावांत तंबूत पाठवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला, यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८० धावांनी हार झाली होती. भारताची ही ट्वेंटी-२० क्रिकेटमधील दुसरी निचांक धावसंख्या ठरली. २००८ मध्ये भारत मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांत तंबूत परतला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com