IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : ना विराट, ना राहुल, ना बुमराह तरी अडीच दिवसात संपणार सामना ? रोहित शर्माचा प्लॅन बी तयार

Ranchi Test Pitch Report : चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. या सामन्यात बुमराहची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे.
IND vs ENG 4th Test Ranchi Pitch
IND vs ENG 4th Test Ranchi Pitchesakal

IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : भारताने राजकोट कसोटीत 434 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरूद्धची मालिका जरी भारतात होत असली तरी भारतीय संघासमोर असंख्य अडचणींचा डोंगार उभा आहे. प्रत्येक सामन्यात रोहित शर्माला आपल्या संघात बदल करावे लागत आहे. अनेक प्रमुख खेळाडूंच्या माघार किंवा दुखापतीमुळे संघ निवडताना अडचणी येत आहेत.

IND vs ENG 4th Test Ranchi Pitch
Ind vs Eng : रांची कसोटीत 'हा' खेळाडू करणार टीम इंडियात पदार्पण? हे असेल गोलंदाजीचे कॉम्बिनेशन

आता चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह हा या मालिकेत भारताचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे रांची कसोटीत भारताला त्याची उणीव नक्कीच भासणार आहे. बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबत अजून तरी कोणती माहिती समोर आलेली नाही.

बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघ रांचीत पहिल्या दिवसापासून टर्न होणारी खेळपट्टी तयार करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भारताने पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता इतर दोन कसोटीत तिसऱ्या चौथ्या दिवशी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी तयार केली होती.

चौथ्या फिरकीपटूचा देखील पर्याय

पहिल्या तीन कसोटीत जसप्रीत बुमराहने आपल्या रिव्हर्स स्विंगद्वारे इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणलं होतं. आता चौथ्या कसोटीत बुमराह नसल्याने आणि त्याच्या इतक्या तोडीचा रिव्हर्स स्विंग करणारा गोलंदाज नसल्याने भारतीय संघ रांचीत टर्निंग ट्रॅक करण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यांचा संघात समावेश होऊ शकतो. भारतीय संघात मुकेश कुमार आणि पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला आकाश दीप हे दोन वेगवान गोलंदाज असले तरी बुमराह सारखा वेग आणि रिव्हर्स स्विंग त्यांच्याकडे नाही. त्यामुळे भारतीय संघ रिस्क न घेता चार फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरू शकतो.

IND vs ENG 4th Test Ranchi Pitch
Virat Anushka Baby Boy : त्याच्या नावासारखंच... विराट अन् अनुष्काला पुत्ररत्न होताच सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

रांचीतील खेळपट्टी कशी असेल?

रांची मधील खेळपट्टी ही काळ्या मातीत तयार केलेली असेल. रांचीमध्ये देखील हैदराबाद, विशाखापट्टणम आणि राजकोट सारखीच खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. जर भारतीय संघ टर्निंग ट्रॅक तयार करण्याचा विचार करत असेल तर ग्राऊंड स्टाफ खेळपट्टीला पाणी देणं बंद करू शकतं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com