IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

India vs England 5th T20I Marathi Cricket News : भारताचा इंग्लंड दौरा अत्यंत निराशाजनक ठरला. संपूर्ण ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तर इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत वर्चस्व राखत मालिकेवर निर्विवाद शिक्कामोर्तब केले.
IND vs ENG fourth T20I unwanted records

Shreyas Iyer unwanted record during India vs England match as Indian captain

esakal

Updated on

India vs England 5th T20I Marathi Cricket News: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल शरणागती पत्करली. इभ्रत वाचवण्यासाठी पाचव्या ट्वेंटी-२०त मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पुन्हा अपयश आले. इंग्लंडच्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ ५६ धावांवर गडगडला. इंग्लंडने ही मालिका ४-० अशी जिंकली आणि भारतीय संघाचा हा पाच ट्वेंटी-२० सामन्यातील सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com