India vs England T20I series 2026 full schedule
Where to watch India vs England T20 series live? आयर्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आता इंग्लंडचा सामना करायला डरहॅम येथे दाखल झाली आहे. पाच ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका संघ इथे खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत भारताला हार पत्करावी लागली होती. भारतीय फलंदाजांनी आयर्लंडविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळाली अशी मागणी जोर धरतेय... पुन्हा एकाद वैभवच्या नावाची हवा करून मालिकेची उत्सुकता वाढवण्याचा चॅनेल व प्रसिद्धी माध्यमांचा प्रयत्न आहे. पण, ही मालिका सुरु केव्हा होतेय आणि सामने कुठे पाहता येतील?