Where to watch India vs England Test series live in India? शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी क्रिकेटची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया नव्या दमाच्या खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाचा खरा कस या पहिल्याच मालिकेतच लागणार आहे. पण, ही मालिका कुठे पाहता येणार आहे आणि Live Telecaste बद्दल महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत.