IND vs IND A day 1 highlights and player performances : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारत आणि भारत अ संघांमध्ये इंट्रा स्क्वॉड सराव सामना कालपासून सुरू झाला. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे आणि त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधाराने चांगल्या खेळाची झलक दाखवली आहे आणि टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वॉड सराव सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे.