

INDIA VS JAPAN
esakal
INDIA VS JAPAN T20 MEDIA RIGHTS: भारतीय संघ २२ सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध एक टी-२० सामना खेळणार आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी जपान क्रिकेटने आपला संघही जाहीर केला आहे. भारत आणि जपान यांच्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या सामन्याच्या प्रसारणाबाबत काही दिवसांपासून पेच निर्माण झाला होता. हा सामना YouTube वर थेट प्रक्षेपित केला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता या सामन्याचे मीडिया राईट्स निश्चित झाले असून, भारतात हा सामना कुठे पाहता येणार हे स्पष्ट झालं आहे.