

India vs Japan
esakal
IND vs JPN,CRICKET RECORD: भारत आणि जपान यांच्यात मंगळवारी (२२ सप्टेंबर) सानो येथे एकमेव टी-२० सामना झाला. परंतु पावसाने सामन्यामध्ये खोडा घातला आणि मैदान ओलं असल्याने हा सामना ५-५ षटकांचा खेळवण्यात आला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ षटकांत ४ विकेट्स गमावत ३२ धावा केल्या. हे छोटं लक्ष्य जपानला गाठता आलं नाही. भारताने जपानला ३ विकेट्स गमावत ३० धावांवर रोखलं आणि अत्यंत थरारक सामन्यात २ धावांनी विजय मिळवला.